नागपुरात पहिल्या चरणात निवडणुका झाल्या. नागपुरचा असल्या मुळे काळजी आणि उत्सुकता होती. त्यात आमचे नितीन भाऊ उभे होते. अनेक जणानां फोन केला आणि माहिती घेतली. दादांनी साध्या घरातून येऊन ऐवढी मोठी कामगिरी केली आहे की विरोधक सुद्धा अवाक झालेत. सोनिया गांधींनी सुद्धा संसदेत त्याची तारीफ केली. त्यांचे कार्य पक्षापूर्ती मर्यादित नव्हते. सर्व नागरीकांसाठी त्यांनी अनेक कामं केलेत. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी नको नको ते त्यांना म्हटले पण गंगा सफाई साठी त्यांना सोबत घेऊन काम केले. हमखास काम करणारा नेतां म्हणजे गडकरी पण स्वताच्या नागपुरात फसले. कारण DMK - दलित, मुस्लीम आणि कुणबी यांच्या नेत्यानी रचलेली कारस्थाने. मिळालेल्या माहितीच्या आधारे गडकरी यांना फक्त ब्राम्हण म्हणून मतदान न करता दुसऱ्या कुठल्या पक्षाला केले. गडकरीजी हारणार नाही ही काळ्या दगडावरीची रेघ, जर ते हरले तर हा पराजय त्यांचा नसुन नागपुरातील जनतेचा असेल. नितीन दादांनी डोळ्या समोर पुढचे १०० वर्ष ठेऊन संपुर्ण नागपुरच्या विकासाला दिशा आणि गती दिली.
नितीन दादा तुम्ही चुकलात, तुम्ही सुद्धा शाळा, काॅलेज काढुन बसायला पाहिजे होतं किंवा तुमच्या पोरांना, सुनानां आणुन अनेक पिढ्याचां उद्धार करायला पाहिजे होता हो. आपण जरी एकविसाव्या शकतात असलो तरी आमची बुद्घी आणि आकलन शक्ती ही अठराव्या शतकातली आहे. आम्ही जरी सुशिक्षित म्हणवून घेत असलो तरी अजून सुजाण आणि परिपक्व होणे बाकी आहे. आजही आम्ही जुनं आणि जातीपाती वरच राजकारण करणार. त्या पुढं जाणं आम्हाला शक्य नाही. देशाला कसं नेतृत्व पाहिजे?का पाहिजे ? हे आम्हाला कधी समजणार ? कारण नेतृत्व करणारे फक्त स्वत: पुरताच विचार करतात. त्यांना त्याच्या पडिकडले दिसत नाही किंवा ते पाहू इच्छित नाही. हा विचार देश विघातक आहे हे ही त्यांना कळत नाही, सर्व पक्ष माहाराज शिवाजी यांना पुजतात पण त्यांची शिकवणुक सोयीस्करपणे विसरतात कारण महाराजांनी जात कधीच पाहिली नाही, स्वत:चा फायदा कधी केला नाही. जे केले ते फक्त आणि फक्त देशासाठी,राज्या साठी. आज आपण विचार करतो तो स्वत: पुरताच का ?
श्रीश शिंगारे
No comments:
Post a Comment