आजम खान हे उत्तर प्रदेश मधील मोठे राजकिय व्यक्ती, जेव्हा माध्यमांना खरमरीत उत्तरे किवां प्रतिक्रिया हवी असते तेव्हा मिडिया त्यांच्या कडे धाव घेत असते. भाजपाची केंद्रात सत्ता असल्या मुळे मागील पाच वर्षात त्यांनी बरीच विचित्र विधाने केली आणि चांगली TRP आणि Footage घेतले. इथे तो मुद्धाच नाही. मुद्धा आहे तो त्यांनी केलेले जयाप्रदा वरील विधान. राजनितीला घाणेरड्या स्तरावर नेण्यात आश्या नेत्यांचा मोठा वाटा आहे. त्यात भर म्हणजे त्यांना आपल्या विधानाबद्दल खेद नाही. यावरून त्यांच्या मुजोर वृत्तीचा प्रत्यय येतो. अश्या वृत्तीच्या लोकांना समर्थन ही मिळते. एका महिलेचा सर्वांसमोर सर्रास अपमान केला जात असताना, स्वयंम घोषित आणि इतर महिला संस्थानी आजम खानच्या या विधानावर आक्षेप घेतला का? महिलांना ठराविक मंदिरात प्रवेश मिळण्यासाठी धडपड करणारे आता कुठे आहेत? फक्त देवळात प्रवेश मिळवण्यासाठीच राजकारण करायचं होतं का? स्त्री ची अस्मिता जाणणारे आणि जपणारे आता मोर्चा का काढत नाही? एका महिलेबद्दल घाणेरडे विधान केल्यावर महिलांचे नेतत्व करणारे मुग गिळुन गप्प का? कुठे आहेत हे सर्व? अजून तुमचं स्त्री- अस्मिता जागृत झाली नाही का? जेव्हा संपुर्ण देश आजम खानच्या विधानाचा विरोध करत आहेत तेव्हा तुम्ही कुठे आहात?
श्रीश शिंगारे
No comments:
Post a Comment