Wednesday 17 April 2019

नागपुरात पहिल्या चरणात निवडणुका झाल्या


नागपुरात पहिल्या चरणात निवडणुका झाल्या. नागपुरचा असल्या मुळे काळजी आणि उत्सुकता होती. त्यात आमचे नितीन भाऊ उभे होते. अनेक जणानां फोन केला आणि माहिती घेतली. दादांनी साध्या घरातून येऊन ऐवढी मोठी कामगिरी केली आहे की विरोधक सुद्धा अवाक झालेत. सोनिया गांधींनी सुद्धा संसदेत त्याची तारीफ केली. त्यांचे कार्य पक्षापूर्ती मर्यादित नव्हते. सर्व नागरीकांसाठी त्यांनी अनेक कामं केलेत. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी नको नको ते त्यांना म्हटले पण गंगा सफाई साठी त्यांना सोबत घेऊन काम केले. हमखास काम करणारा नेतां म्हणजे गडकरी पण स्वताच्या नागपुरात फसले. कारण DMK - दलित, मुस्लीम आणि कुणबी यांच्या नेत्यानी रचलेली कारस्थाने. मिळालेल्या माहितीच्या आधारे गडकरी यांना फक्त ब्राम्हण म्हणून मतदान न करता दुसऱ्या कुठल्या पक्षाला केले. गडकरीजी हारणार नाही ही काळ्या दगडावरीची रेघ, जर ते हरले तर हा पराजय त्यांचा नसुन नागपुरातील जनतेचा असेल. नितीन दादांनी डोळ्या समोर पुढचे १०० वर्ष ठेऊन संपुर्ण नागपुरच्या विकासाला दिशा आणि गती दिली.
नितीन दादा तुम्ही चुकलात, तुम्ही सुद्धा शाळा, काॅलेज काढुन बसायला पाहिजे होतं किंवा तुमच्या पोरांना, सुनानां आणुन अनेक पिढ्याचां उद्धार करायला पाहिजे होता हो. आपण जरी एकविसाव्या शकतात असलो तरी आमची बुद्घी आणि आकलन शक्ती ही अठराव्या शतकातली आहे. आम्ही जरी सुशिक्षित म्हणवून घेत असलो तरी अजून सुजाण आणि परिपक्व होणे बाकी आहे. आजही आम्ही जुनं आणि जातीपाती वरच राजकारण करणार. त्या पुढं जाणं आम्हाला शक्य नाही. देशाला कसं नेतृत्व पाहिजे?का पाहिजे ? हे आम्हाला कधी समजणार ? कारण नेतृत्व करणारे फक्त स्वत: पुरताच विचार करतात. त्यांना त्याच्या पडिकडले दिसत नाही किंवा ते पाहू इच्छित नाही. हा विचार देश विघातक आहे हे ही त्यांना कळत नाही, सर्व पक्ष माहाराज शिवाजी यांना पुजतात पण त्यांची शिकवणुक सोयीस्करपणे विसरतात कारण महाराजांनी जात कधीच पाहिली नाही, स्वत:चा फायदा कधी केला नाही. जे केले ते फक्त आणि फक्त देशासाठी,राज्या साठी. आज आपण विचार करतो तो स्वत: पुरताच का ?
श्रीश शिंगारे

संपुर्ण देश आजम खानच्या विधानाचा विरोध करत आहेत

आजम खान हे उत्तर प्रदेश मधील मोठे राजकिय व्यक्ती, जेव्हा माध्यमांना खरमरीत उत्तरे किवां प्रतिक्रिया हवी असते तेव्हा मिडिया त्यांच्या कडे धाव घेत असते. भाजपाची केंद्रात सत्ता असल्या मुळे मागील पाच वर्षात त्यांनी बरीच विचित्र विधाने केली आणि चांगली TRP आणि Footage घेतले. इथे तो मुद्धाच नाही. मुद्धा आहे तो त्यांनी केलेले जयाप्रदा वरील विधान. राजनितीला घाणेरड्या स्तरावर नेण्यात आश्या नेत्यांचा मोठा वाटा आहे. त्यात भर म्हणजे त्यांना आपल्या विधानाबद्दल खेद नाही. यावरून त्यांच्या मुजोर वृत्तीचा प्रत्यय येतो. अश्या वृत्तीच्या लोकांना समर्थन ही मिळते. एका महिलेचा सर्वांसमोर सर्रास अपमान केला जात असताना, स्वयंम घोषित आणि इतर महिला संस्थानी आजम खानच्या या विधानावर आक्षेप घेतला का? महिलांना ठराविक मंदिरात प्रवेश मिळण्यासाठी धडपड करणारे आता कुठे आहेत? फक्त देवळात प्रवेश मिळवण्यासाठीच राजकारण करायचं होतं का? स्त्री ची अस्मिता जाणणारे आणि जपणारे आता मोर्चा का काढत नाही? एका महिलेबद्दल घाणेरडे विधान केल्यावर महिलांचे नेत‌त्व करणारे मुग गिळुन गप्प का? कुठे आहेत हे सर्व? अजून तुमचं स्त्री- अस्मिता जागृत झाली नाही का? जेव्हा संपुर्ण देश आजम खानच्या विधानाचा विरोध करत आहेत तेव्हा तुम्ही कुठे आहात?
श्रीश शिंगारे